

Amazon Bets Big on India! $48 Billion Investment Plan Set to Transform AI, Cloud & Jobs
eSakal
Amazon News: अॅमेझॉनचे CEO अँडी जॅसी यांनी आज 25 जून 2026 रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी अॅमेझॉन 2030 पर्यंत देशातील AI आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचा विस्तार करण्यासाठी अतिरिक्त 13 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा जॅसी यांनी केली. यामुळे 2026 ते 2030 दरम्यान एआय आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचा विस्तारासाठी अॅमेझॉनची गुंतवणूक 21 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होणार आहे. त्यामुळे Amazon ही भारतातील AI आणि क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वात मोठ्या जागतिक कंपन्यांपैकी एक ठरणार आहे.