

Apple Becomes Richer Than India iPhone 17 Launch Pushes Market Value Beyond GDP Levels
दिग्गज टेक कंपनी Appleचे बाजार भांडवल ४ ट्रिलियन डॉलरच्या वर पोहोचलं आहे. भारतीय चलनानुसार कंपनीचं बाजार मूल्य ३५२ लाख कोटी रुपयांवर पोहोचलंय. हा आकडा भारताच्या जीडीपी इतका आहे. वर्ल्ड बँकेच्या पोर्टनुसार भारताचा जीडीपी जवळपास ३.९१ ट्रिलियन डॉलर इतका आहे. काउंटरपॉइंट रिसर्चच्या डेटानुसार, अमेरिका आणि चीनमध्ये iPhone17ची सुरुवातीची विक्री ही जुन्या मॉडेलच्या तुलनेत १४ टक्के जास्त झालीय. भारतासह जगभरात iPhone 17ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.