

Why Are FIIs Pulling Money Out of Indian Markets?
sakal
गौरव बोरा, शेअर बाजार विश्लेषक
भारत आज जगातील सर्वांत वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. मजबूत ‘जीडीपी’ वाढ, डिजिटल इंडियाचा विस्तार आणि पायाभूत सुविधांवरील विक्रमी खर्च यामुळे भारताबद्दल जागतिक स्तरावर कमालीची उत्सुकता आहे. मात्र, या सकारात्मक वातावरणाचे रूपांतर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (एफआयआय) गुंतवणुकीत होताना दिसत नाही. उलट, जागतिक गुंतवणूकदार भारतीय बाजारात अपेक्षेइतका विश्वास दाखवण्याऐवजी काहीसे साशंक दिसत आहेत.