

The programme promotes investment awareness, disciplined financial planning and self-employment opportunities through mutual fund distribution.
Sakal
डॉ. वीरेंद्र ताटके, गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
भारतीय लोक बचत करण्यात अग्रेसर असतात. परंतु, बचत केलेल्या रकमेची गुंतवणूक करण्यासाठी तितकेसे जागरूक नसतात, असे म्हटले जाते. अलीकडील काळात ही परिस्थिती बदलत असली, तरी नियोजनबद्ध गुंतवणुकीबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता करण्यात अजूनही वाव आहे. महागाई, बदलती आर्थिक परिस्थिती आणि वाढत्या आर्थिक गरजा लक्षात घेता केवळ बचत पुरेशी नसून, योग्य गुंतवणूक करणेही तितकेच महत्त्वाचे झाले आहे, हे घराघरापर्यंत पोहचले पाहिजे आणि त्यासाठी घरातील एक सदस्य प्रशिक्षित असला पाहिजे. या पार्श्वभूमीवर ‘हर घर एमएफडी’ हा उपक्रम आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी आणि प्रशिक्षित म्युच्युअल फंड वितरक (एमएफडी) तयार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.