

Indian mutual funds are gaining dominance as domestic investors continue to drive stock market growth despite FII selling.
Sakal
गौरव बोरा, शेअर बाजार विश्लेषक
भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत तब्बल ५५.३ लाख नवे फोलिओ जोडत पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला आहे. जागतिक स्तरावर पश्चिम आशियातील तणाव, अस्थिर बाजारपेठ आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (एफआयआय) विक्रीच्या पार्श्वभूमीवरही भारतीय गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कायम ठेवली. ताज्या आकडेवारीनुसार, एचडीएफसी, आयसीआयसीआय, निप्पॉन इंडिया आणि बंधन या चार म्युच्युअल फंड कंपन्यांनी मिळून जवळपास ४५ टक्के नवे फोलिओ आकर्षित केले.