

डेटातून निर्णय: गुंतवणुकीत एआयची क्रांती
E sakal
Why AI Will Redefine Mutual Funds, SIPs, and Retail Investing
लक्ष्मीकांत श्रोत्री
lshrotri@hotmail.com
आजच्या काळात गुंतवणुकीची पद्धत आणि साधने जलदगतीने बदलत आहेत. आता डिजिटल क्रांतीमुळे माहिती सर्वांच्या हातात सहज आली आहे; तसेच खरेदी-विक्रीही घरात बसून मोबाईलच्या साह्याने अगदी वेगवान पद्धतीने होत आहे. या प्रक्रियेला आणखी वेग देणारे तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि त्यावर आधारित गुंतवणूक साधने. ही साधने येत्या काही वर्षांत भारतीय गुंतवणूकदारांचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकतील. योग्य माहिती, वैयक्तिक सल्ला, शिस्तबद्ध गुंतवणूक, सुरक्षितता आणि ट्रेंडचे अंदाज या सर्व गोष्टींमुळे गुंतवणूक अधिक स्मार्ट आणि परिणामकारक होईल.