

Investment in growing Indian economy
Esakal
सुधाकर कुलकर्णी - sbkulkarni.pune@gmail.com
भारत सध्या जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असून, लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या वाढत्या अर्थव्यवस्थेत मध्यमवर्गीयांचा मोठा वाटा आहे. वाढत्या उत्पन्नामुळे त्यांच्या जीवनशैलीत, खर्चाच्या पद्धतीत आणि भविष्यासंदर्भातील दृष्टिकोनात लक्षणीय बदल दिसून येतो. याच पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार विविध पर्याय शोधत आहेत. या गरजेला प्रतिसाद देत अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी ‘लाइफस्टाइल फंड’ या नावाने योजना सुरू केल्या आहेत.
इफस्टाइल फंड हे म्युच्युअल फंडच असले, तरी त्यांची रचना आणि कार्यपद्धती पारंपरिक फंडांपेक्षा वेगळी असते. या योजना दीर्घकालीन भांडवलीवाढ साध्य करण्यासाठी शेअर आणि डेट सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक करतात. या फंडांमध्ये फंड व्यवस्थापक दीर्घकालीन वाढीची क्षमता आणि स्थिर कॅशफ्लो असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर भर देतात. हे फंड गुंतवणूकदाराचे वय, जोखीम घेण्याची क्षमता, आर्थिक उद्दिष्टे यांचा विचार करून तयार केलेले असतात. लाइफस्टाइल फंड हे विशेष गुंतवणूक फंड आहेत. लाइफस्टाइल फंडात गुंतवणूक करणे आणि पारंपरिक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे यात फरक आहे.