
वसंत कुलकर्णी - ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
अॅक्सिस बँकिंग अँड पीएसयू डेट फंडाला आठ जून २०२५ रोजी १३ वर्षे पूर्ण झाली. या फंडात पहिल्या दिवशी म्हणजे आठ जून २०१२ रोजी गुंतविलेल्या एक लाख रुपयांचे सहा जून २०२५ रोजी ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार १,६५,०६६ रुपये झाले आहेत. या गुंतवणुकीवर परताव्याचा वार्षिक दर ७.७८ टक्के आहे. रिझर्व्ह बँकेने ६ जून रोजी जाहीर केलेल्या पतधोरण आढावा बैठकीत रेपोदरात अर्ध्या टक्क्याची कपात केली आहे. या पार्श्वभूमीवर, आकर्षक परताव्याचा दर (यिल्ड कर्व्ह) चलनवाढ मर्यादित राहण्याचा अंदाज आणि वास्तविक व्याजदर (‘व्याजदर वजा महागाईचा दर’- रिअल इंटरेस्ट रेट) यामुळे पुढील वर्षभरात रोखे गुंतवणूक करणारे फंड चांगला जोखीम समायोजित परतावा देतील.