
भूषण ओक - शेअर बाजार अभ्यासक-विश्लेषक
बालू फोर्ज इंडस्ट्रीज ही कंपनी १९८९ मध्ये प्रल्हाद सिंग चंडोक यांनी बेळगाव येथे क्रँकशाफ्ट तयार करण्यासाठी एक मशिनिंग प्रकल्प म्हणून स्थापन केली. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मुंबई येथे, तर उत्पादन सुविधा कर्नाटक व संयुक्त अरब अमिरातीत आहेत. रिव्हर्स विलीनीकरणाद्वारे २०२० मध्ये ही एक नोंदणीकृत कंपनी बनली. कंपनी अचूक इंजिनिअरिंग उत्पादने, फोर्ज्ड् उत्पादने व क्रँकशाफ्टचे उत्पादन करते. त्यात रेल्वेची चाके, अॅक्सल, रेल्वेच्या डब्यांचे भाग, ट्रान्समिशन, क्लच, चॅसिसचे भाग आदींचा समावेश आहे.