

Healthcare Sector: A Safe Investment Haven
Sakal
वसंत कुलकर्णी - ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
आरोग्यनिगा हे गुंतवणुकीसाठी सुरक्षित उद्योगक्षेत्र मानले जाते. या उद्योगाचा बाजार निर्देशांक एका वर्षीच्या घसरणीनंतर सार्वकालिक उच्चांकाच्या जवळ आहे. व्यापक बाजारपेठेवर अनिश्चित आणि अस्थिर जागतिक वातावरणाचा परिणाम झाल्याने मूल्यांकन वाजवी पातळीवर आले आहे. या टप्प्यावर, आरोग्य सेवा क्षेत्रात बचावात्मक वाढीच्या संधी खुणावत असल्याने बंधन म्युच्युअल फंडाने हेल्थकेअर फंड आणला असून, हा ‘एनएफओ’ शनिवार (ता.८) गुंतवणुकीस खुला होत आहे.