Bank Holiday
Sakal
Bank Holiday Maharashtra : वर्षाचा शेवटचा महिना सुरु आहे. त्यामुळे आपण सध्या पैशाचे नियोजन करण्याचा विचार करत असतो. अशावेळी बँकेत जाऊन आपण आपले व्यवहार करत असतो. त्यामुळेजर तुम्ही येत्या काही दिवसांत बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. डिसेंबर महिन्याच्या उरलेल्या दिवसांत वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेत जाण्याआधी तुमच्या शहरातील बँक सुट्ट्यांची यादी एकदा नक्की तपासा अन्यथा तुमचा बिनकामाचा वेळ वाया जाऊ शकतो.