

New Taxi App Bharat Taxi Promises 30% Lower Fares, Zero Commission for Drivers
eSakal
Bharat Taxi App : जर तुम्हाला प्रवासासाठी ओला-उबरचे वाढते भाडे महाग वाटत असेल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. देशाच्या वाहतूक क्षेत्रात मोठा बदल घडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज ‘भारत टॅक्सी अॅप’ या देशातील पहिल्या सहकारी टॅक्सी सेवेचे उद्घाटन करणार आहेत. ही सेवा सहकारी (को-ऑपरेटिव्ह) मॉडेलवर आधारित आहे. याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना कॅब, टॅक्सी आणि ऑटो सेवा उपलब्ध होणार आहे.