Crypto
Sakal
Bitcoin Cryptocurrency : जगभरात मागच्या काही वर्षांपासून क्रिप्टोकरन्सीची मोठ्या प्रमाणात चर्चा सूरु आहे. आतापर्यंत क्रिप्टोला अमेरिका, युरोप आणि भारतासारख्या देशांनी वैधानिक दर्जा न दिल्यामुळे क्रिप्टोकरन्सी बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून क्रिप्टोकरन्सीबाबत चिंता कायम होती. मात्र, आता क्रिप्टोकरन्सी बाजारात सुधारण्याचे संकेत दिसू लागले आहेत.