

Big Relief for Homebuyers? Home Loan Tax Benefits in Focus in Budget 2026
eSakal
Tax Relief for Homebuyers : १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात घर खरेदीदारांसाठी एक मोठी अपेक्षा आहे की, गृहकर्जावरील व्याजाची कमाल कर सवलत २ लाखांऐवजी ५ लाख करण्याची घोषणा होऊ शकते. लोकांकडून होणारी ही मागणी गेल्या काही वर्षांत घरांच्या किमती वाढल्यामुळे आणि कर्जाची रक्कम मोठी झाल्यामुळे अधिक महत्वाची ठरली आहे. नव्या कर व्यवस्थेऐवजी जुन्या कर व्यवस्थेत गृहकर्जदारांची पसंती असल्याचेही सांगितले जात आहे.