
अनेक लोकांची समस्या अशी आहे की, जर खात्यात पैसे नसतील तर बँक सरासरी किमान बॅलन्स चार्ज कापते. पण आता बचत खात्याच्या ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही. अलिकडेच एसबीआयसह पाच मोठ्या बँकांनी सरासरी मासिक बॅलन्सच्या स्वरूपात आकारले जाणारे शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे. याचा अर्थ आता तुमचे खाते रिकामे राहिले तरी बँकेकडून कोणतेही शुल्क कापले जाणार नाही. बँकांनी आता किमान बॅलन्स चार्ज रद्द केला आहे.