Business Success Story: ५ हजारात सुरु केलेल्या Kolhapuriच्या बिझनेसमधून ३ कोटींची कमाई, हर्षवर्धनची भरारी

Business Success Story: पुण्यातील एका तरुणाने त्याचं हेच स्वप्न मेहनत आणि जिद्दीच्या बळावर पूर्ण केलंय. महाराष्ट्रात गेल्या अनेक शतकांपासून वापरण्यात येणाऱ्या कोल्हापूरी चप्पलेला Kolhapuri Chappal त्याने नवी ओळख निर्माण करून दिलीय
 Kolhapuri Chappal business Success Story
Kolhapuri Chappal business Success StoryEsakal

Business Success Story: अलिकडे अनेकांना स्वत:चा व्यवसाय करायचा असतो. मग शिक्षण कमी असो वा उच्च शिक्षित स्वत:चा व्यवसाय करण्याला अनेकजण प्राधान्य देतात. मात्र प्रत्येकालाच व्यवसायात जम बसवता येतो असं नव्हे.

अनेकदा पदरी निराशा पडते. अनेक उच्च शिक्षित किंवा परदेशातून शिक्षण घेऊन आलेले तरुण स्वत:चा व्यवसाय करण्याचं स्वप्न बाळगतात. मात्र प्रत्येकाचं स्वप्न सत्यात उतरतंच असं नव्हे. Pune Youth Kolhapur Chappal Brand now becoming famous

कारण व्यवसाय Business करणं म्हणजे नोकरी करण्यापेक्षा खूप मोठी जबाबदारी असते. त्यात स्वत:चा पैसा गुंतलेला असतो. व्यवसायात काम करणाऱ्यांची जबाबदारी आणि व्यवसायाची जबाबदारी असते.

त्यातही स्वत:चा ब्रॅण्ड Brand तयार करणं म्हणजे मोठा पल्ला. उत्तम क्वालिटी राखून ब्रॅण्डचा आवाका वाढवणं. ब्रॅण्डची ओळख निर्माण करून ती टिकवणं अशा अनेक मोठ्या जबाबदाऱ्या असतात. मात्र जर मेहनतीला जिद्दीची जोड दिली तर हे सर्व शक्य होतं.

हे देखिल वाचा-

 Kolhapuri Chappal business Success Story
Kolhapuri Chappal: कोल्हापुरी चप्पलची गुणवत्ता टिकवणे गरजेचे ; ओंकार धर्माधिकारी

पुण्यातील एका तरुणाने त्याचं हेच स्वप्न मेहनत आणि जिद्दीच्या बळावर पूर्ण केलंय. महाराष्ट्रात गेल्या अनेक शतकांपासून वापरण्यात येणाऱ्या कोल्हापूरी चप्पलेला Kolhapuri Chappal त्याने नवी ओळख निर्माण करून दिलीय.

पुण्यातील हर्षवर्ध पटवर्धनने अवघ्या ५ हजार रुपयांपासून कोल्हापूरी चप्पलेचा बिझनेस सुरू केला. आज तो करोडो रुपये कमावतो आहे. हर्षवर्धनचा कोल्हापूरी चप्पलचा चॅपर्स हा ब्रॅण्ड असून या ब्रॅण्डच्या चप्पलांना परदेशातही मागणी आहे. हर्षवर्धनच्या या यशस्वी प्रवासाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हर्षवर्धनचं शालेय शिक्षण आणि कॉलेज पुण्यात झालं. त्यानंतर पुढील शिक्षण त्याने युरोपमधील नॉर्थ इंग्लंड युनिव्हर्सिटत पूर्ण केलं. युरोपमध्ये MBA करत असताना हर्षवर्धनच्या निरिक्षणात एक गोष्ट आली ती म्हणजे.

तिथे पुरुषही हिरवे, पिवळे, गुलाबी तसचं नियॉन रंगाचे बूट आणि चपला वापरतात. भारतात मात्र पुरुषांसाठी बनणारी बूट किंवा चप्पल या खास करून काळ्या, ब्राऊन अशा रंगांच्या असतात. भारतातही लाखो चप्पल बनतात. मात्र त्या सगळ्या काळ्या ब्राऊन आणि हाच स्टिरिओटाइप हर्षवर्धनला मोडून काढायचा होता.

कॉलेजमध्ये असताना एकदा ट्रेडिशनल डेला हर्षवर्धनने कुर्त्यावर नाईकीची सॅण्डल घातली होती. हे पाहून त्याचा भाऊ नाराज झाला. भावाने त्याची कोल्हापूरी हर्षवर्धनला घालण्यासाठी दिली आणि तेव्हा पासूनच हर्षवर्धन कोल्हापूरी चप्पलेच्या प्रेमात पडला.

तेव्हापासून तो कायम कोल्हापूरी घालू लागला. अगदी युरोपमध्ये शिकत असतानाही हर्षवर्धन बर्ष आणि क्लब वगळता तो कायम कोल्हापूरी घालू लागला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हर्षवर्धन पुण्यात परतला.

वडिलांच्या एक्सपोर्ट व्यवसायात हातभार लावू लागला. मात्र हर्षवर्धनला स्वत:चा व्यवसाय करायचा होता. यासाठी त्याने अनेक बिझनेस आयडियावर विचार केला. विविध बिझनेस कल्पनांवर विचार करूनही यश मिळत नव्हतं. त्यामुळे तो थोडा निराश झाला.

एकेदिवशी तो मित्रांसोबत बाहेर असताना त्याने लेदर जॅकेट आणि कोल्हापूरी घातली होती. यावेळी अचानक त्याच्या डोक्यात एक विचार आला. त्याने घातलेलं जॅकेट आणि चप्पल दोन्ही चामड्याचे होते.

मात्र दोघांमध्ये खूप फरक होता. जॅकेट हे अत्यंत सॉफ्ट म्हणजेच मऊ चामड्याचं होतं. तर चप्पल ही कडक चामड्याची होती. यामुळेच कदाचित अनेकजण कोल्हापूरीला पसंती देत नसावे.

मात्र जर कोल्हापूरीदेखील मऊ चामड्याची बनली तर. आणि हिच कल्पना बिझनेसच्या रुपात उतरवायची हे त्याने पक्क केलं. कोल्हापूरी चप्पलांना वेस्टर्न टच द्यायचा. त्याचा कन्फर्ट वाढवायचा. वेगवेगळ्या रंगांमध्ये त्या लोकांपर्यंत पोहचवायच्या हे त्याने ठरवलं.

हे देखिल वाचा-

 Kolhapuri Chappal business Success Story
Fashion Tips : शॉपींगचा प्लॅन आहे? या सोप्या टिप्स वापरा अन् आपले जुने कपडे अगदी ब्रॅंडेड बनवा!

अभ्यास सुरु केला

कोल्हापूरी चप्पलांचा बिझनेस सुरू करायचा हे घरी सांगून त्याने पुढे काम सुरू केलं. त्यासाठी त्याने कोल्हापूरी चप्पलची जन्मभूमी कोल्हापूर गाठलं.

तिथून काही कारागिरांकडून काहीशा वेगळ्या डिझाईनच्या चप्पला विकत घेतल्या. त्यानंतर मुंबईतील धारावी गाठलं. इथून त्याने काही हटके डिझाईनच्या सॅण्डल घेतल्या. त्यानंतर पुन्हा कोल्हापूर गाठलं.

कल्पनाशक्तीच्या बळावर त्याने हटके पॅटर्नच्या निळ्या आणि हिरव्या रंगाच्या कोल्हापूरी तयार करून घेतल्या. त्यातल्या त्रुटी समजून घेतल्या. त्यानंतर चामड्याचं पूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी तो चेन्नईत पोहचला.

इथं लेदर तयार होणाऱ्या ठिकाणी त्याने लेदरची माहिती घेतली. कोणतं केमिकल वापरल्यास ते मऊ होवू शकतं. शिवाय त्याची टिकाऊ क्षमता वाढू शकते. सर्व माहिती घेऊन तो पुण्यात परतला आणि व्यवसायाला सुरुवात केली.

छोटेखानी दुकानापासून सुरुवात

हर्षवर्धनेन पुण्यातील शनिवार पेठेत एक छोटेखानी ऑफिस कम दुकान सुरु केलं. यावेळी वेगवेगळ्या डिझाईन, रंग आणि पॅटर्नवर प्रयोग सुरु होते. त्यानंतर खूप विचार केल्यानंतर त्याने ‘चॅपर्स’ हे ब्रॅण्डचं नाव ठरवलं. ब्रॅण्डचा लोगो तयार केला. सोशल मीडियाच्या मदतीने ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग सुरू केलं. सुरुवातीला काही प्रदर्शनांमध्ये त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

त्यानंतर त्याने पुण्यात स्टोअर सुरू केले आहेत. चॅपर्सच्या स्टोअरमध्ये तुम्हाला ५ हजार रुपयांपासून ते अगदी ५० हजार रुपये किंमतीच्या विविध स्टाइलच्या कोल्हापूरी मिळतील.

हर्षवर्धनने १२ रिटेलर्सची हातमिळणी केली असून त्याच्या चॅपर्स ब्रॅण्डच्या चप्पला आता महाराष्ट्राबाहेरही उपलब्ध होत आहेत. फ्रान्स आणि स्पेन सारख्या देशांमध्येही त्याचे ग्राहक आहेत. तसचं अनेक सेलिब्रिटीही चॅपर्सचे जोड वापरतात. सचिन तेंडूलकरने देखील हर्षवर्धनचं कौतुक केलं होतं.

केवळ ५ हजार रुपये जवळ असताना हर्षवर्धनने चॅपर्स हा ब्रॅण्ड सुरू केला होता. आज त्याच्या कंपनीचा रेव्हेन्यू ३ करोड इतका आहे. पुण्यातील ४ मॉल्समध्ये त्याचं रेटेल स्टोअर आहे. तर येत्या काळात त्याला देशभरात ३५० स्टोअर सुरू करण्याचं स्वप्न आहे. तसचं त्याला चॅपर्सला एक इंटरनॅशनल ब्रॅण्ड बनवायचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com