

TDS correction filing
sakal
डॉ. दिलीप सातभाई- ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट- सीए
प्राप्तिकर कायदा, १९६१च्या कलम २०० मध्ये प्रकरण १७-ब अंतर्गत करकपात करण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीची कर्तव्ये नमूद केली आहेत. त्यानुसार, करकपात करणाऱ्या व्यक्तीने उद्गमस्थानी कापलेला कर (टीडीएस) केंद्र सरकारकडे जमा करणे आणि विहित मुदतीत निर्धारित विवरणपत्रे दाखल करणे आवश्यक आहे. उद्गमस्थानी करसंकलनासाठी (टीसीएस) कलम २०६ सी अंतर्गत अशीच एक प्रणाली अस्तित्वात आहे. या दोन्ही तरतुदींमध्ये मूळ सादर केलेल्या माहितीमधील चुका सुधारण्यासाठी किंवा तपशील अद्ययावत करण्यासाठी दुरुस्ती विवरणपत्रे दाखल करण्याची तरतूद समाविष्ट आहे.