Insurance Sector: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! १००% FDI ला मंजुरी; इंश्योरन्स क्षेत्रात मोठा धमाका, पण LIC साठी नियम वेगळे

100 percent FDI in insurance sector: केंद्र सरकारने स्वयंचलित मार्गाने विमा क्षेत्रात १००% थेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. यामुळे परदेशी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करणे सोपे होईल.
100 percent FDI in insurance sector

100 percent FDI in insurance sector

ESakal

Updated on

जर तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी विमा पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल, किंवा आधीच दरवर्षी मोठा प्रीमियम भरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी थेट संबंधित आहे. केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, जो विमा क्षेत्राचे संपूर्ण स्वरूप बदलून टाकेल. देशाच्या विमा क्षेत्रात १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीचा (FDI) मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने शनिवारी स्वयंचलित मार्गाने याला मंजुरी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com