
Government Ban Diwali Gifts
ESakal
केंद्र सरकारने या दिवाळीत सार्वजनिक खर्चाने भेटवस्तू देण्याच्या पद्धतीवर बंदी घातली आहे. अर्थ मंत्रालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, कोणतेही मंत्रालय, विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) भेटवस्तूंवर किंवा उत्सवाशी संबंधित कोणत्याही गोष्टीवर खर्च करणार नाही. सरकारी निधीचा वाया घालवण्यापासून रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.