

Central Government On Pensioners Payment Slip
ESakal
केंद्र सरकारने सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिस (CPAO) द्वारे सर्व अधिकृत बँकांच्या सेंट्रल पेन्शन प्रोसेसिंग सेंटर्स (CPPCs) ला निर्देश दिले आहेत की, प्रत्येक सेंट्रल सिव्हिल पेन्शनर आणि फॅमिली पेन्शनरला मासिक पेन्शन पेमेंट स्लिप वेळेवर मिळतील याची खात्री करावी. हे पाऊल पेन्शनधारकांच्या वाढत्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आहे. ज्यांपैकी बरेच जण त्यांच्या पेन्शन स्लिप वेळेवर न मिळाल्यामुळे त्रास सहन करत होते.