Ujjwala Scheme: उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा झटका! केंद्र सरकारने सबसिडीच्या सिलिंडरची संख्या घटवली; आता किती मिळणार?

LPG latest update: केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या सिलिंडरवरील अनुदान कमी केले आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना दरवर्षी नऊ सिलिंडर मिळत होते, पण आता फक्त चारच मिळतात.
Ujjwala scheme

Ujjwala scheme

ESakal

Updated on

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरवर्षी फक्त चार अनुदानित सिलिंडर मिळतील. सरकारने दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या सिलिंडरची संख्या नऊवरून चारवर आणली आहे. गरीब कुटुंबांतील प्रौढ महिलांना डिपॉझिटशिवाय एलपीजी कनेक्शन देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) मे २०१६ मध्ये सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला लाभार्थ्यांना दरवर्षी १२ अनुदानित १४.२-किलोचे सिलिंडर मिळत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com