

Medical Devices GST Cut
ESakal
सरकारने सर्व औषध कंपन्यांना नवीन जीएसटी प्रणाली अंतर्गत २२ सप्टेंबर २०२५ पासून औषधे, फॉर्म्युलेशन आणि वैद्यकीय उपकरणांच्या एमआरपीमध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत. जीएसटी दरांमध्ये कपात केल्याने ग्राहकांना आणि रुग्णांना फायदा होईल असे राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने म्हटले आहे. सरकारने औषध कंपन्यांना डीलर्स, किरकोळ विक्रेते, राज्य औषध नियंत्रक आणि सरकारला नवीन जीएसटी दर आणि अद्ययावत एमआरपीसह नवीन किंमत यादी किंवा पूरक किंमत यादी जारी करण्यास सांगितले आहे.