EPFO
Sakal
EPFO : जर तुम्ही नोकरी करणारे कर्मचारी असाल आणि दर महिन्याला तुमच्या पगारातून PF (प्रॉव्हिडंट फंड) कापला जात असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. मागच्या काही दिवसांपासून 'कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना' (EPFO) सदस्यांनी तक्रार केली आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांचे EPF पासबुक एन्ट्रीज दिसत नाहीत. त्यामुळे सदस्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. कारण, PF ही तुमच्या सर्वात सुरक्षित बचतींपैकी एक मानली जाते. ही बचत हळूहळू वाढत जाऊन भविष्यात एक मोठा फंड तयार करते.