अर्थबोध : आई कुठे काय करते?

युद्धजन्य अस्थिरतेत वाढत्या महागाई-गरिबीच्या पार्श्वभूमीवर काटकसर, बचत आणि ‘कॉस्ट कंट्रोल’ची सूत्रे घराघरात राबवताना आईची आर्थिक दूरदृष्टी कुटुंबाला सुरक्षित ठेवणारी ठरते
आई कुठे काय करते? ती तर घराची 'फायनान्स मिनिस्टर'! जागतिक युद्धाच्या सावटात 'काटकसर आणि बचती'चा स्त्री-मंत्र ठरणार गेमचेंजर

आई कुठे काय करते? ती तर घराची 'फायनान्स मिनिस्टर'! जागतिक युद्धाच्या सावटात 'काटकसर आणि बचती'चा स्त्री-मंत्र ठरणार गेमचेंजर

Sakal

Updated on

डॉ. वीरेंद्र ताटके, गुंतवणूक विषयाचे अभ्यासक

जेव्हा युद्धाची परिस्थिती उद्‍भवते, तेव्हा काटकसरीचे महत्त्व कळते. एरवी सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या वस्तू मिळविण्यासाठी अशावेळी जास्त पैसे मोजावे लागतात आणि टंचाईचा सामनादेखील करावा लागतो. सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धामुळे भारतातील सुमारे २५ लाख लोक गरिबीच्या खाईत लोटले जातील, अशी भीती संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. युद्ध संपले, तरी त्याचे हे विपरीत परिणाम दूरगामी राहतील, असेही यात म्हटले आहे. यामुळे उत्पन्न वाढविण्यावर मर्यादा येतील, अशावेळी काटकसर आणि बचत हा मंत्र परिणामकारक ठरू शकतो. यासाठी खर्चांवर नियंत्रण ठेवणे (कॉस्ट कंट्रोल) आणि काही खर्च मुळातूनच कमी करणे (कॉस्ट रिडक्शन) गरजेचे आहे. अर्थात, हे फक्त देशाच्या पातळीवर पुरेसे नाही, तर अगदी व्यक्तिगत पातळीवरसुद्धा करावे लागते. सध्या प्रत्येक घरातदेखील कॉस्ट कंट्रोल आणि कॉस्ट रिडक्शन अपरिहार्य असून, या आघाडीवर गृहिणींची भूमिका महत्त्वाची आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com