

Why Your CIBIL Score May Fall Even After Clearing Credit Card Bills
sakal
-ॲड. रोहित एरंडे, कायद्याचे जाणकार
तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे आणि कर्जाची परतफेड जेवढी बिनचूक कराल तेवढा तुमचा सिबिल स्कोअर चढत्या क्रमाचा असतो. सोप्या शब्दांत सिबिल स्कोअर हा आपली कर्ज फेडण्याची योग्यता आहे की नाही, हे दर्शविणारा आरसा समजला जातो आणि कर्ज फेडण्यात कसूर झाल्यास या आरशाला तडे जाऊ शकतात. परंतु, वेळेत कर्ज फेड करूनही क्रेडिट कार्ड ग्राहकाला थकबाकीदारच दर्शविल्यामुळे कर्जदाराचे सिबिल रेटिंग कमी झाले, याला सेवेतील त्रुटी म्हणूनच संबोधता येईल, असा निकाल चंडीगड येथील दोन सदस्यीय ग्राहक मंचाने नुकताच दिला.