

Crowdfunding In India
esakal
गेल्या काही काळात दुर्धर आजारावरील महागड्या उपचारांसाठी निधी जमा करण्यासाठी समाजमाध्यमांद्वारे लोकांना अगदी छोटी रक्कम देण्याचे आवाहन केले जात असल्याचे आपल्याला दिसते. अशा प्रकारे लोकांकडून अगदी अल्प प्रमाणात पैसे घेऊन मोठा निधी उभा करण्याच्या या पद्धतीला ‘क्राउड फंडिंग’ असे म्हणतात. अलीकडच्या काळात उद्योग-व्यवसायाच्या भांडवल उभारणीसाठीदेखील ‘क्राऊड फंडिंग’चा पर्याय प्रचलित होत आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्लॅटफॉर्मही उपलब्ध झाले आहेत. याद्वारे गुंतवणुकीची संधीही निर्माण होत आहे.