
32 year old crypto investor found dead after major market crash authorities investigate
Esakal
बिटकॉइन आणि इथेरियमसह इतर क्रिप्टोकरन्सीच्या किंमती शुक्रवारी जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजारात अचानक कोसळल्या. यामुळे क्रिप्टोकरन्सी बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. दरम्यान, शनिवारी एका ३२ वर्षीय क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदाराचा मृतदेह लम्बोर्गिनी कारमध्ये मृतावस्थेत आढळून आला. क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीत नुकसान झाल्यानं त्यानं आत्महत्या केल्याच्या चर्चा आहेत. युक्रेनियन गुंतवणूकदाराचे नाव कॉन्स्टँटिन गॅलीश असं आहे.