Cyber Security:समाज माध्यमाचा संतुलित वापर आवश्यक

Cyber Fraud:समाजमाध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचं प्रमाण वाढलं माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक होत आहे. या समाजमाध्यमांचा काळजीपूर्वक वापर करणे अत्यावश्यक आहे.
Cyber Security
Cyber SecurityE sakal
Updated on

शिरीष देशपांडे, सीए आणि सायबर गुन्हेविषयक अभ्यासक

सोशल मीडिया अर्थात समाज माध्यम हे सध्या संवादाचे आवश्‍यक माध्यम आणि २४ तास उपलब्ध असणारे (करमणुकीचे!) साधन झाले आहे. इंटरनेट तंत्रज्ञानावर अवलंबून असलेले हे माध्यम मोबाईल फोनद्वारे कोणालाही सहज वापरता येते.

त्यातल्या त्यात व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि गुगल हे खूपच लोकप्रिय झाले आहेत. डेटा पॅक आणि मोबाईलचे खाते असले, की झाले. वापरकर्ता अक्षरशः एका क्लिकवर अख्खे जग बघू शकतो. मात्र सायबर सुरक्षेचंही भान राखायला हवं.

तंत्रज्ञानाचा हा अविष्कार जितका उपयुक्त ठरला आहे, तितकेच त्याचे धोकेही वाढले आहेत. अलीकडे या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक होत आहे. या समाजमाध्यमांचा काळजीपूर्वक वापर करणे अत्यावश्यक आहे.

सोशल नेटवर्कचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे वेग. कोणतीही माहिती जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात तातडीने पोहोचू शकते. क्षणार्धात तुम्हाला हवी ती माहिती मिळू शकते. सोशल नेटवर्क आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यामुळे अचूक माहिती मिळू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com