

Company Overview: A Pioneer in Indian Transformer Manufacturing Since 1967
Sakal
भूषण ओक, शेअर बाजार विश्लेषक
व्होल्टॅॲम्प ट्रान्सफॉर्मर्स लि. ही भारतातील इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर तयार करणारी एक आघाडीची कंपनी आहे. १९६७ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे मुख्यालय वडोदरा, गुजरात येथे असून ती प्रामुख्याने १६० एमव्हीए आणि ११-२२० किलोव्होल्टपर्यंतच्या क्षमतेचे ऑइल-फील्ड डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर १० एमव्हीए आणि ३.३-३३ किलोव्होल्टपर्यंतच्या क्षमतेचे ड्राय पॉवर ट्रान्सफॉर्मरचे उत्पादन करते. त्याचबरोबर कंपनी छोट्या सबस्टेशन्सची कामेही घेते. जगभरात ८० हजार ठिकाणी तिचे ट्रान्सफॉर्मर लागलेले आहेत. भारतातील बहुतेक मोठ्या कंपन्या तिच्या ग्राहक आहेत. येणाऱ्या काळात उत्पादन (कॅपिटल गुडस्) आणि ऊर्जा क्षेत्रात मोठ्या खासगी आणि सरकारी गुंतवणुकी होणार आहेत आणि ‘मेक इन इंडिया’ धोरणानुसार या क्षेत्रांमध्ये घसघशीत वाढ दिसेल. त्यामुळे या कंपनीच्या व्यवसायासाठी धोरणे आणि परिस्थिती खूप पोषक आहे. कंपनीचा जुन्या ट्रान्सफॉर्मरसाठी दुरुस्ती आणि देखभाल विभागसुद्धा आहे आणि या विभागाचा महसूल कमी असला, तरी त्यात मार्जिन तुलनेने जास्त असतात.