

Smart Information: Negligence Is Never Acceptable
Sakal
ॲड. रोहित एरंडे, कायद्याचे जाणकार
रस्त्यावर वाहन चालवताना चालकाने केवळ स्वतःच्या वाहनाच्या हालचालींकडे लक्ष देणे पुरेसे नसते, तर आजूबाजूच्या वाहतुकीचीही योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असते. विशेषतः रस्त्याच्या कडेला किंवा वाहतुकीच्या मार्गात वाहनाचा दरवाजा उघडताना मागून अथवा बाजूने येणाऱ्या वाहनांची पाहणी करणे ही चालकाची मूलभूत जबाबदारी आहे. त्यात कसूर झाल्यास गंभीर अपघात होऊ शकतो. दिल्ली उच्च न्यायालयाने रोशन कुमार साहू प्रकरणात नुकत्याच दिलेल्या एका निर्णयात नमूद केले, की आजूबाजूची वाहतूक न पाहता अचानक वाहनाचा दरवाजा उघडल्यामुळे मागून येणाऱ्या व्यक्तीचा अपघात होणे हे स्पष्ट आणि गंभीर निष्काळजीपणाचे कृत्य आहे. अशा निष्काळजीपणासाठी संबंधित वाहनचालक किंवा विमा कंपनी नुकसानभरपाईसाठी जबाबदार ठरू शकते.