Delhi Goverment Decision
Sakal
Delhi Goverment : देशाची राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे राज्य सरकार एकापाठोपाठ एक निर्णय घेताना दिसत आहे. मागच्या वेळी BS-VI पेक्षा कमी मणक्यांच्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी केल्यानांतर आता रेखा गुप्ता सरकारने वर्क फ्रॉम होम (WFH) बाबतही मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीमधील सर्व सरकारी तसेच खाजगी कार्यालयांमधील ५०% कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
याशिवाय, दुसरा महत्वाचा निर्णय सरकारने सध्या बांधकाम बंद ठेवण्याचा निणर्य घेतल्याने अडचणीत आलेल्या नोंदणीकृत कामगारांच्या खटल्यात प्रत्येकी १० हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली आहे.