firecracker insurance: दिवाळीपूर्वी घ्या 'फायरक्रॅकर इन्शोरन्स'; फक्त ५ रुपयांमध्ये मिळवा ५० हजारांचे विमा संरक्षण!

Why Firecracker Insurance is Important for Diwali Safety: गेल्यावर्षी, फोनपेने दिवाळीदरम्यान होणाऱ्या दुर्घटनांपासून आपल्या ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी फटाके विमा सुरू केला होता
A person lighting firecrackers safely during Diwali — symbolizing the importance of firecracker insurance for protection and peace of mind.

A person lighting firecrackers safely during Diwali — symbolizing the importance of firecracker insurance for protection and peace of mind.

esakal

Updated on

What is Firecracker Insurance and Why You Need It Before Diwali : सध्या सर्वत्र दिवाळीची लगबग आहे. वातावरण उत्साही आहे. सर्वत्र जोरदार कपडे, मिठाई अन् फटाक्यांची खरेदी सुरू आहे. दिवाळीत फटाके फोडताना अनेक दुर्घटनाही घडतात, ज्या आपण दरवर्षी ऐकत असतो बघत असतो. या घटनांमध्ये मालमत्तांचे नुकसान तर कधी जीवितहानीही झाल्याचे दिसते. फटाक्यांमुळे जखमी होणाऱ्यांचे प्रमाणही मोठे असते.

अशावेळी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खास फायरक्रॅकर इन्शोरन्स काढणे हे फायद्याचे ठरते. कारण, यामुळे फटाके फोडताना एखादी दुर्घटना घडली तर त्यामध्ये तुम्हाला संरक्षण प्राप्त होते. विशेष म्हणजे हा विमा खूप कमी प्रीमियमवर येतो आणि चांगले कव्हरही प्रदान करतो.

गेल्या वर्षी, फोनपेने दिवाळीदरम्यान होणाऱ्या दुर्घटनांपासून आपल्या ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी फटाके विमा सुरू केला होता आणि कंपनीने या वर्षीही विमा पॉलिसी सुरू ठेवली आहे. फक्त ११ रुपयांमध्ये, तुम्ही फोनपे फायरक्रॅकर विमा खरेदी करू शकता, जो २५ हजारांचे कव्हर प्रदान करतो. ही फोनपे पॉलिसी ११ दिवसांसाठी वैध आहे.

A person lighting firecrackers safely during Diwali — symbolizing the importance of firecracker insurance for protection and peace of mind.
Nilesh Ghaywal passport case : निलेश घायवळला पासपोर्टसाठी मदत करणाऱ्या एजंटची चौकशी होणार; सध्या कारागृहात भोगतोय शिक्षा

तर या वर्षी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, फिनटेक कंपनी कव्हरश्योरने एक नवीन फटाके विमा पॉलिसी लाँच केली आहे. कंपनी अवघ्या ५ रुपयांच्या प्रीमियमवर ५०००० पर्यंतचे विमा कव्हर देत आहे. कव्हरश्योरची फटाके विमा पॉलिसी ५०००० चा मृत्यू दावा कव्हर देते, तर फटाक्यांमुळे झालेल्या दुखापतींसाठी १०००० चा दावा उपलब्ध असेल. ही विमा पॉलिसी फक्त १० दिवसांसाठी वैध आहे. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन पॉलिसी खरेदी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com