

Diwali Muhurat Trading 2026: Sensex and Nifty Close Higher
esakal
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या विशेष ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे प्रमुख निर्देशांकांनी तेजी नोंदवली. मुंबई शेअर बाजाराचा (BSE) सेन्सेक्स ३९७.९० अंकांनी म्हणजेच ०.४९ टक्क्यांनी वाढून ८१,४२५.९२ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी ५० निर्देशांक ९१.७५ अंकांची वाढ नोंदवत २५,१२२.१० अंकांवर स्थिरावला. निफ्टीमध्ये ०.३७ टक्क्यांची वाढ झाली.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा