
Diwali Investment
Sakal
दिवाळीच्या उत्सवात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्ताचे व्यवहार केले जातात. त्याचबरोबर या उत्सवाच्या कालावधीत शेअर बाजारात गुंतवणूक करून फायदा घेण्याची संधी गुंतवणूकदार शोधत असतात. यानिमित्त काही प्रमुख कंपन्यांनी त्यांच्या संशोधन अहवालाच्या आधारावर काही शेअरची शिफारस केली आहे. जागतिक अनिश्चितता आणि व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर नजीकच्या काळात अस्थिरता कायम आहे. जास्त मान्सून, सेवाक्षेत्रातील गती, स्थिर रोजगार आणि जीएसटी तर्कसंगतीकरण, महागाई कमी होणे, मजबूत बँकिंग कामगिरी, वस्तूंची मागणी यामुळे आशादायक चित्र दिसते. देशांतर्गत घटकांसह जागतिक घटकांमुळेही दीर्घकालीन गुंतवणूकदारांना आकर्षक मूल्यांकनांवर दर्जेदार शेअर खरेदीची संधी आहे.