शेअर बाजार : डायनॅमिक केबल्स (शुक्रवार बंद भाव : रु. ३१६)

ऊर्जावहन क्षेत्रातील वाढत्या मागणीचा लाभ घेत डायनॅमिक केबल्सची विक्री व नफावाढ मजबूत; नवा प्रकल्प सुरू झाल्यानंतर उत्पादनक्षमतेत २०-२५ टक्क्यांपर्यंत उडी अपेक्षित
Corporate Overview: Jaipur-Headquartered Wire and Cable Pioneer Since 1986

Corporate Overview: Jaipur-Headquartered Wire and Cable Pioneer Since 1986

Sakal

Updated on

भूषण ओक, शेअर बाजार विश्‍लेषक

राजस्थानमधील जयपूर येथे मुख्यालय असलेली डायनॅमिक केबल्स लि. ही भारतातील एक प्रमुख वायर आणि केबल उत्पादक कंपनी आहे. १९८६ मध्ये डायनॅमिक इंजिनिअर्स या नावाने एका भागीदारी कंपनीच्या स्वरूपात स्थापित झालेली ही कंपनी २०१७ मध्ये बाजारात नोंदणीकृत झाली. जयपूर येथे कंपनीचे तीन उत्पादन प्रकल्प आहेत. कंपनी उच्च व्होल्टेज, मध्यम व्होल्टेज, लो व्होल्टेज पॉवर केबल्स, कॉपर आणि अल्युमिनियम वायर कंडक्टर, इन्सुलेटेड कंडक्टर, एरियल बंच्ड केबल्स आणि इतर औद्योगिक केबल बनवते. भारतात शहरी आणि ग्रामीण विद्युतीकरण, नूतनीकरणीय ऊर्जा प्रकल्प आणि इन्फ्रास्ट्रक्चर विकासात या केबलचा व्यापक वापर आहे. कंपनीच्या उत्पन्नात उच्च व्होल्टेज केबलचा सुमारे ६४ टक्के, लो व्होल्टेज केबलचा सुमारे ३० टक्के, तर कंडक्टरचा सुमारे सहा टक्के वाटा आहे. ९३ टक्के विक्री देशांतर्गत आहे, तर निर्यातीचा वाटा सात टक्के आहे. मार्च २०२६ अखेरीस कंपनीकडे अंदाजे ८०८ कोटी रुपयांच्या ऑर्डर आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com