

ECLGS 5.0 Scheme
esakal
शशांक वाघ - keshwa60@gmail.com
केंद्र सरकारने ५ मे २०२६ रोजी आपत्कालीन पतपुरवठा हमी योजना ५.० म्हणजेच इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीमची (ईसीएलजीएस) पाचवी आवृत्ती जाहीर केली. कोविड-१९ नंतर २०२० मध्ये सुरू झालेली ही योजना आता पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा आणली जात आहे. या योजनेचा घेतलेला आढावा...
केंद्र सरकारने आपत्कालीन पतपुरवठा हमी योजना ५.० म्हणजेच इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीमची (ईसीएलजीएस) पाचवी आवृत्ती जाहीर केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये यासाठी ९,००० कोटी रुपयांची तरतूद केली होती. आता संपूर्ण आराखडा स्पष्ट झाला आहे. ‘ईसीएलजीएस’ १.० ते ३.० योजनांनी कोविड-१९ काळात १.१९ कोटी लघु व मध्यम उद्योजकांना ३.६८ लाख कोटी रुपयांचे हमीयुक्त कर्ज दिले. त्यामुळे १४.६ लाख लघु उद्योजकांची खाती अनुत्पादित (एनपीए) होण्यापासून वाचली. आता पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्चे तेल, मालवाहतूक, पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. विशेषतः विमान वाहतूक, पर्यटन, निर्यातदार लघु उद्योजकांना रोख तरलतेची अडचण भासत आहे. त्यांना तातडीने खेळते भांडवल मिळावे, हाच ‘ईसीएलजीएस- ५.०’ योजनेचा हेतू आहे.