

Economic Survey 2025-26: Key Insights on India’s Economy and Inflation
eSakal
Economic Survey GDP Growth : देशाच्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. यानुसार, आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर 6.8 ते 7.2 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. हा अंदाज सध्याच्या आर्थिक वर्षासाठी अपेक्षित असलेल्या 7.4 टक्के विकासदरापेक्षा कमी असल्याने, पुढच्या वर्षात अर्थव्यवस्थेच्या गतीत किंचित मंदी येण्याची शक्यता आहे.