एडलवाइस मिड कॅप फंड

एडलवाइस मिड कॅप फंडाने २० वर्षांत सातत्यपूर्ण परतावा देत बेंचमार्कला मागे टाकले आहे. अस्थिरतेवर मात करत दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा फंड उच्च परताव्याचा मजबूत पर्याय ठरतो.
Edelweiss Mid Cap Fund: 20 Years of Performance Excellence

Edelweiss Mid Cap Fund: 20 Years of Performance Excellence

Sakal

Updated on

वसंत कुलकर्णी (ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार)

म्युच्युअल फंड

एडलवाइस मिड कॅप फंड येत्या २६ डिसेंबर रोजी १९ वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात प्रवेश करेल. या फंडाने ऑक्टोबर २०२५ पर्यंत सलग सहा तिमाहीत क्रिसिल म्युच्युअल फंड रँकिंग (CMFR) मिड कॅप फंड गटात ‘टॉप क्वारंटाइल’मध्ये सातत्याने स्थान मिळविले आहे. ३१ ऑक्टोबर २०२५ या दिवशी फंड १२६४६ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करीत होता. ऑक्टोबर २०२१ पासून त्रिदीप भट्टाचार्य या फंडाचे व्यवस्थापक आहेत. या फंडाने एक, दोन, तीन, पाच आणि सात वर्षांच्या कालावधीत त्याच्या मानदंडसापेक्ष (निफ्टी मिड कॅप १५० टीआरआय) चांगली कामगिरी केली आहे. ३० नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आकडेवारीनुसार, या फंडाने एक, तीन, पाच आणि सात वर्षांच्या कालावधीत फंडाने मिड कॅप गटातील एचडीएफसी मिड कॅप, निप्पॉन इंडिया मिड कॅप (ग्रोथ) यांसारख्या दिग्गज फंडाच्या तोडीस तोड (काही शतांश टक्के कमी अधिक) कामगिरी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com