

पुणे - भारतीय वाहन बाजारपेठेत पारंपरिक इंधनासोबतच आता इलेक्ट्रिक वाहनांचीही पाळेमुळे घट्ट होताना दिसत आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेषतः तीनचाकी वाहनांच्या श्रेणीत दर १० पैकी ६ वाहने इलेक्ट्रिक असल्याचे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या (एफएडीए) जानेवारी २०२६ च्या अहवालातून समोर आले आहे.