

Electronic Gold Receipts EGR
esakal
ऋषिकेश उगले - rushikesh.ugale@mcqube.in
सध्या सोने आयातीवरील खर्च कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने प्रत्यक्ष स्वरूपात सोने खरेदी करू नये, असे आवाहन केले आहे. अशावेळी राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) उपलब्ध केलेला हा पर्याय सोने खरेदीसंबंधी असलेल्या बऱ्याच अडचणी सोडविण्यास मदत करेल. ‘उत्तर शोधलं, की जगणं बदलतं’ असे म्हणतात. सोनेखरेदीबाबत गुंतवणूकदारांच्या दीर्घकालीन प्रश्नांचे उत्तर शोधण्याचे काम ‘एनएसई’ने ‘इलेक्ट्रॉनिक्स गोल्ड रिसिट्स’ म्हणजचे ‘ईजीआर’च्या माध्यमातून केले आहे. नेमका हा नवा पर्याय काय आहे?... आणि या ‘संधीचे सोने’ आपण कसे करू शकतो?... त्यावर टाकलेला हा प्रकाशझोत.
न्याने पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात एक विश्वासार्हता निर्माण केली आहे. गुंतवणुकीपलीकडे जाऊन संस्कृती, भावना व आर्थिक स्थैर्य यांचा संगम म्हणून त्यास ओळखले जाते. सोन्यावरील विश्वास वर्षानुवर्षे कायम राहिला, तरी त्यामध्ये गुंतवणूक करण्याचे नवनवे पर्याय आर्थिक जगामध्ये उपलब्ध करण्यात आले. परंतु, सोने खरेदीबाबत चोरी होणे, कमी शुद्धतेचे सोने मिळणे, फसवणूक, सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था, बाजारात विकण्यावेळी योग्य भाव न मिळणे असे अनेक प्रश्न भेडसावत असतात. एकाच गुंतवणूक पर्यायातून हे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) इलेक्ट्रॉनिक्स गोल्ड रिसिट्स म्हणजचे ‘ईजीआर’च्या माध्यमातून केला आहे.