

CITES System Launch
esakal
Provident Fund News: कोट्यवधी नोकरदार आणि पीएफ खातेधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता कर्मचाऱ्यांना पीएफवर मिळणाऱ्या व्याजासाठी महिनोनमहिने वाट पाहावी लागणार नाही. ईपीएफओने नवीन सेंट्रलाइज्ड आयटी सिस्टीम लागू केली असून, या नवीन डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून १५ जुलैपर्यंत सुमारे ३४ कोटी पीएफ खात्यांमध्ये ८.२५ टक्के दराने तब्बल १.४४ लाख कोटी रुपयांचे व्याज जमा केले जाणार आहे.