उत्तम गुंतवणूक : सिमेन्स

तांत्रिक विश्लेषणानुसार ‘वेज ब्रेकआउट’चा तेजीचा संकेत; टप्प्याटप्प्याने खरेदीची रणनीती आणि ४६०० रुपयांचे पहिले उद्दिष्ट सुचवले
गुंतवणुकीसाठी 'सिमेन्स' सज्ज! तांत्रिक आलेखावर 'वेज ब्रेकआउट'चे संकेत; ८००० रुपयांपर्यंत मजल मारण्याची विश्लेषकांचा अंदाज

गुंतवणुकीसाठी 'सिमेन्स' सज्ज! तांत्रिक आलेखावर 'वेज ब्रेकआउट'चे संकेत; ८००० रुपयांपर्यंत मजल मारण्याची विश्लेषकांचा अंदाज

Sakal

Updated on

मकरंद विपट, ‘सेबी’ रजिस्टर रिसर्च ॲनालिस्ट

सिमेन्स लि. ही कंपनी उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांसाठी उत्पादने आणि एकात्मिक उपाययोजना, प्रक्रिया उद्योगांसाठी ड्राइव्ह, पायाभूत सुविधा, जीवाश्म इंधन आणि तेल व वायू अनुप्रयोगांपासून कार्यक्षम आणि स्वच्छ ऊर्जानिर्मिती; तसेच रेल्वेसह प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी विद्युत ऊर्जेचे पारेषण आणि वितरण, रेल्वे विद्युतीकरण प्रणाली पुरवते. या शेअरच्या तांत्रिक विश्लेषणाचा साप्ताहिक कालावधीचा आलेख सोबत दिला आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये ४४५२ रुपयांचा उच्चांक गाठल्यावर या शेअरचा भाव घसरत गेला आणि एप्रिल २०२५ मध्ये हा भाव २४५० रुपयांपर्यंत खाली आला. त्यानंतर ब्रॉडर इंडेक्स म्हणजे ‘निफ्टी’मध्ये जवळपास १५ टक्क्यांची वाढ झाली; पण या शेअरचा भाव ३४४० ते २८३० रुपये या टप्प्यात फिरत राहिला. विशेष म्हणजे गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या युद्धामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली. परंतु, या शेअरचा भाव बाजाराबरोबर खाली आला नाही, तर या टप्प्यातच फिरत राहिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com