Farmer Scheme
Sakal
Prime Minister Kisan Maandhan Yojana : केंद्र सरकार शेतकऱ्यांना पेन्शन देण्यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM Kisan Maandhan Yojana) राबवत आहे. नोकरी करणारे लोक स्वतःचे निवृत्ती नियोजन नीट करतात, पण अनेक शेतकरी अजूनही या योजनेपासून अनभिज्ञ असतात. वृद्धावस्थेत शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. यात पात्र शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ₹3000 पेन्शन दिली जाते.