

FASTag Rule Update: No More Stopping at Toll – AI to Deduct Charges Instantly!
eSakal
Toll Rule Update: देशभरात आता टोल प्लाझावर लांब रांगेत उभे राहण्याचे दिवस संपणार आहेत. आता तुमची गाडी क्रॉस झाली की टोल आपोआप कापला जाईल. त्यामुळे आता कुठेही थांबण्याची, वाद घालण्याची गरज नाही आणि तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. याचे कारण म्हणजे सरकार एक अशी प्रणाली लागू करत आहे, ज्यामध्ये एक कॅमेरा तुमचा नंबर वाचेल आणि तुमच्या खात्यातून थेट पैसे कापले जातील. जर सर्व काही नियोजनानुसार झाले, तर हा बदल डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष दिसून येईल. चला जाणून घेऊयात नेमकं काय आहे हा नियम...