

Nirmala Sitharaman Union Budget 2026 Team
ESakal
अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग नववे अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी करत आहेत. अर्थ मंत्रालयातील नोकरशहांची एक अनुभवी टीम त्यांना या कामात मदत करत आहे. ७.४ टक्के विकास दर आणि अनिश्चित भू-राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा पूर्ण अर्थसंकल्प असेल. महत्त्वाचे म्हणजे, यावेळी अर्थसंकल्प तयार करण्याची जबाबदारी एका महिला अधिकाऱ्याच्या हाती आहे.