
लक्ष्मीकांत श्रोत्री - गुंुतवणूक सल्लागार
आपल्या देशात सणासुदीचा हंगाम म्हणजे उत्साह, आनंद आणि भरभरून खरेदीचा काळ असतो. दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, नवरात्र अशा सणांमध्ये घरांची सजावट, नवे कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, सोने-चांदी, भेटवस्तू यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. बँका आणि वित्तीय संस्था या काळात आकर्षक कर्ज योजना, शून्य टक्के व्याजदर योजना, क्रेडिट कार्ड ईएमआय सुविधा आणि ‘आत्ताच खरेदी करा, नंतर पैसे द्या’ (बीएनपीएल) अशा आकर्षक योजना घेऊन बाजारात उतरतात.