Premium|School Financial Education : शाळेपासूनच आर्थिक साक्षरता; बचत आणि गुंतवणुकीचे धडे का आवश्यक आहेत?

Financial Literacy for Students : शालेय स्तरावर आर्थिक साक्षरतेचे शिक्षण दिल्यास बचत, खर्च, गुंतवणूक आणि आर्थिक शिस्तीचे संस्कार लहानपणापासून रुजून जबाबदार व आत्मनिर्भर नागरिक घडण्यास मदत होऊ शकते.
School Financial Education

School Financial Education

esakal

Updated on

डॉ. वीरेंद्र ताटके - tatakevv@yahoo.com

बचत, खर्चाचे नियोजन, गुंतवणूक आणि आर्थिक शिस्त यांचे धडे लहानपणापासूनच मिळणे आवश्यक बनले आहे. शालेय जीवनात आर्थिक शिक्षणाची सुरुवात झाली, तर भविष्यात जबाबदार, आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिक घडू शकतात. याच विषयावर शिक्षक आणि अनिकेत यांच्यात झालेला हा संवाद...

शिक्षक : अरे अनिकेत, आज अचानक इकडे कसा काय? (हसत) आणि पुन्हा शाळेत प्रवेश घेतलास का? शाळेचा गणवेश परिधान करून आला आहेस! छान दिसतो आहेस या गणवेशात.

अनिकेत : धन्यवाद सर. आज शेजारच्या शाळेत आलो होतो. माझ्या भावाच्या मुलाला शाळेत प्रवेश घेतला आहे. शाळा गेल्या महिन्यातच सुरू झाली आहे; पण आज आम्ही त्याला शाळेत सोडण्यासाठी घरातील सगळेजण आलो होतो. त्याला मॅचिंग म्हणून मी आणि भावाने शाळेच्या गणवेशासारखा ड्रेस घातला. शाळेतून थेट तुमच्याकडे गप्पा मारायला आलो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com