
Dussehra 2025 - Smart investment strategies
E sakal
आनंद पोफळे
anandpophale@gmail.com
‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असे दसऱ्याचे वर्णन केले जाते. यालाच विजयादशमीदेखील म्हटले जाते. या दिवशी रावणदहन आणि सरस्वतिपूजन, शस्त्रपूजा केली जाते आणि त्याबरोबरच सीमोल्लंघनदेखील करण्याची परंपरा आहे. कुटुंबाची आर्थिक आघाडी सांभाळणारे आपण सर्वजणही आपल्या आर्थिक प्रवासात अनेक मोहिमा आखतो, नवे उपक्रम सुरू करतो; पण या प्रवासात नक्की मात कशावर करायची आहे, हे लक्षात घेतले, तर मोहीम यशस्वी होईलच आणि आपले ‘आर्थिक’ विजयाचे सीमोल्लंघनही होईल.