

Flexi-Cap investment strategy, ICICI Prudential fund, diversified portfolio
Sakal
प्रसाद संगम (संचालक, अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस प्रा.लि.)
फ्ले क्सी-कॅप गुंतवणुकीचे धोरण म्हणजे विविध बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे. यामुळे मोठ्या कंपन्या (लार्ज-कॅप), मध्यम कंपन्या (मिड-कॅप) आणि लहान कंपन्या (स्मॉल-कॅप) यामध्ये गुंतवणूक होते, आणि प्रत्येक श्रेणीसाठी ठरावीक मर्यादा नसतात. शेअरचे मूल्यांकन आणि व्यापक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन पोर्टफोलिओ लवचिक राहतो, ज्यामुळे वेगवेगळ्या आकाराच्या कंपन्यांमध्ये आवश्यकतेनुसार गुंतवणुकीचे प्रमाण बदलता येते. थोडक्यात सांगायचे, तर हे एक गतिशील आणि खऱ्या अर्थाने विविधीकृत धोरण आहे, जे बाजारातील संधींचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी पोर्टफोलिओ बदलण्याची परवानगी देते. यामुळे गुंतवणुकीसाठी अधिक पर्याय उपलब्ध होतात आणि प्रभावी; तसेच वाढीवर आधारित वैविध्यीकरण साध्य होते.