

Foreign Investors in Indian Markets
esakal
ऋषिकेश उगले rushikesh.ugale@mcqube.in
भारतीय शेअर बाजारात परकी गुंतवणूकदारांचा वाटा नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. परकी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली, तर शेअर बाजारात घसरणी होण्याची शक्यता अधिक असते. परंतु, हा परिणाम कमोडिटी जगतामध्ये का बघावयास नाही मिळाला? परकी गुंतवणूकदारांचा कमोडिटी बाजारातील सहभाग कमी का जाणवतो व यामध्ये त्यांना गुंतवणुकीस अनुकूल वातावरण करण्यासाठी ‘सेबी’ काय योजना आखत आहे, या विषयावर टाकलेला हा प्रकाशझोत...
मागील एका वर्षांपासून शेअर बाजारातील गुंतवणूकदार एका सुरामध्ये गात आहेत, ‘परदेसी मेरे यारा वादा निभाना, मुझे याद रखना- कही भूल न जाना... परदेसी, परदेसी जाना नही!!’ या गाण्यातील ओळी आपल्याला दर्शवतात, की मागील दोन वर्षांत गुंतवणूकदारांना किती नकारात्मक परिणामाला सामोरे जावे लागले. शेअरची झालेली धुलाई, युद्धाचे सावट व रुपयाची विक्रमी पातळीवर झालेली घसरण यामुळे परकी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पळ काढला. मागील दोन वर्षांपासून तब्बल चार लाख कोटी इतक्या उच्चांकी पातळीवर शेअरची विक्री झाल्यामुळे त्याचे पडसाद परताव्यात दिसून आले. एकूण शेअर बाजाराचा १७ टक्के हिस्सा परकी गुंतवणूकदारांकडे असल्यामुळे त्यांचा शेअर बाजारामधील सहभाग किती महत्त्वाचा आहे, याची प्रचिती आली. परंतु, हा परिणाम कमोडिटी जगतामध्ये का बघावयास नाही मिळाला? परकी गुंतवणूकदारांचा कमोडिटी बाजारातील सहभाग कमी का जाणवतो व यामध्ये त्यांना गुंतवणुकीस अनुकूल वातावरण करण्यासाठी ‘सेबी’ काय योजना आखत आहे, या विषयावर आपण प्रकाश टाकू या.